Day: November 20, 2020
-
ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत श्री.सत्तार बोलत होते. बैठकीला दोन्ही जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी आणि कक्ष अधिकारी उपस्थित होते. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही श्री. सत्तार…
-
कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील १७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत
मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री…
-
ग्रामीण घरकूल निर्मितीला गती देण्यासाठी राज्यात महाआवास अभियान – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत “महाआवास अभियान-ग्रामीण” राबविले जाणार आहे. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले पूर्ण करण्याचा…
-
राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा
मुंबई : राज्यात आज ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज राज्यात ५,६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोनाबाधित…
-
शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय…
-
कृषिपंप वीज धोरणातून राज्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्याला वेळेवर आणि दर्जेदार सेवा देणे ही आमची प्राथमिकता असून त्या दृष्टीकोनातून नवीन कृषीपंप वीज धोरण २०२० शासनाने आणले आहे. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी आणण्यासाठी हे धोरण ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या धोरणांतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात येणार असल्याचेही श्री. राऊत…
-
दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. २० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कशी ओळखाल खाद्यपदार्थांची भेसळ’ या विषयावर अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दिनांक २१ व सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन…
-
ग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८२ लाख घरकुलांची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला असून सर्वांनी एकत्रित सहभागातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यस्तरीय…
-
देशात सर्वाधिक ‘आयुष्मान भारत केंद्र’ महाराष्ट्रात
नवी दिल्ली 20, : सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी आयुष्मान भारत या योजनेची सुरूवात केंद्र शासनाने 2018 मध्ये केली. यातंर्गत देशभरात 50 हजाराहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्र (एचडब्ल्यूसी) कार्यरत आहेत. यामध्ये सर्वाधिक 6381 केंद्र महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात असणारी 6381 आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये 4117 सहायक आरोग्य केंद्र आहेत. ही…
-
शाळा सुरू करणं बंधनकारक नाही ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई,दि.20 : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असंही बंधन नसणार…