Day: February 10, 2021
-
रोमिओगिरी करणाऱ्यांवर चाप; महिला व मुलींकडे एकटक पाहत राहणं म्हणजे विनयभंगच
अनेकदा रोड रोमिओ महिला व मुलींकडे वाईट नजरेने एकटक पाहतात. त्यामुळे अनेकदा महिला व मुलींना याचा नाहक त्रास होतो. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबाद सत्र न्यायालयानं एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही…
-
बळीराजाला दिलासा | तीन लाखांचे बिनव्याजी पीक कर्ज मिळणार ; ठाकरे सरकार
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्नशील आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारनंही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच…
-
माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट साठी मनपाने केले आवाहन
मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करणाऱ्या संरक्षण दलाच्या सेवेतील माजी सैनिकांना देशासाठी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षणाचे केलेले कार्य विचारात घेऊन नगरविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे राज्यातील नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने…
-
वर्सोवामध्ये गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, 4 जण जखमी; अग्निशमन दलाच्या 16 गाड्या दाखल
मुंबईतील वर्सोवामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भाषी आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असून ती लेव्हल 2 ची आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत आतापर्यत 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. वर्सोवा परिसरातील यारी रोडवर ही आग लागल्याची घटना…
-
मोठी बातमी | ‘लोकमंगल’ संचालकांच्या विरोधात आरोपपत्र
लोकमंगल मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तत्कालीन दहा संचालकांविरुद्ध न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली होती. २०१५ मध्ये लोकमंगल मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटी ( बीबी दारफळ ) यांच्यामार्फत शासनाकडे दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळेचा प्रस्ताव पाठवला होता.…