Month: April 2022
-

रोडकरी | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात दाखल ; हजारो कोटींच्या प्रकल्पाचे होणार लोकार्पण
रोडकरी | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात दाखल ; हजारो कोटींचा प्रकल्पाचे होणार लोकार्पण सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari )आज रविवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले आहेत. सोमवार दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता सोलापूर येथे विजापूर रोडवरील नेहरूनगर परिसरातील शासकीय क्रीडांगणावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
-

तुम्ही लई धुतल्या तांदळासारखे ..? म्हणूनच ,जाग आणण्यासाठी ‘भजन आंदोलन’
जनता महागाई, बेरोजगारी, रोजची इंधन-खाद्यतेल दरवाढ, लोडशेडींग अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त आहे. दुसरीकडे विविध समाज घटक आरक्षणाच्या प्रश्नाने अस्वस्थ आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण असे सगळेच आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. कोरोना महामारीच्या दणक्याने कंबरडे मोडलेली सर्वसामान्य जनता केंद्र, राज्य सरकार दिलासा देणारं काही तरी राजकारण करेल या प्रतिक्षेत आहे.राजकारण्यांना लोकांची प्रश्न…
-

यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता ;समन्वय ठेवून नियोजन करावे – जिल्हाधिकारी
कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. ही वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन…
-

BREAKING | राजद्रोहाचा आरोप ; राणा दांपत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..
मुंबई : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान आणि राजद्रोहाचा आरोपाखाली अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दांपत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वांद्रे न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. त्यानंतर राणा दांपत्याने…
-

महिलांना रोजगार | माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने शिलाई मशिन वाटप
बिपीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ एस व्ही सी एस हायस्कूल जवळील पालवरची शाळा येथे विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. जेमिनी बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बिपीन पाटील यांना दीर्घायुष्यासाठी मंडळाच्या वतीने महापूजा करण्यात आले. याप्रसंगी अशोक जेनुरे, सिद्राम यलदड्डी, लिंगप्पा मोलनकर, विजू कोळी, विजय गोरकल, रविराज कलशेट्टी, प्रशांत कलशेट्टी, मल्लू कोळी, संतोष कोळी,…
-

गोविंदा.. गोविंदा.. ! उध्दव ठाकरेच हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते : पुरुषोत्तम बरडे
सोलापूर :- कसलाही गाजावाजा न करता नेहमीच सर्वांना सोबत घेऊन जात हिंदुत्वाची कास कधीच न सोडणारे उध्दव ठाकरे हेच खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करणारे इतर नेते तोतया हिंदू नेते आहेत, जे जाती-धर्मात तेढ निर्माण करुन स्वतःची पोळी भाजून घेण्यात धन्यता मानतात असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केले. तिरुमला तिरुपती…
-

प्रिसिजन संगीत महोत्सवाचे थाटात उद्घाटन
सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर सभाग्रहात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले पहिल्या सत्रात प्रख्यात संतूर वादक पंडित दिलीप काळे यांच्या संतूर वादनाने व दुसऱ्या सत्रात रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले. प्रिसिजन संगीत महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रिसिजन उद्योग…
-

प्राण्यांचे मुखवटे घालून बालगोपाळांचे सोलापुरात ‘आंदोलन’ ; पहा काय आहे कारण ..
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूररासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम राहावी म्हणून संभाजी ब्रिगेड च्या वतीने प्राणिसंग्रहालयाच्या गेट जवळ विविध प्राण्यांचे मुखवटे चढून संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बालगोपाळसुद्धा सहभागी झाले होते. विविध अडचणी अन् समस्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’मधील प्राणी…
-

CEO स्वामींचा आदेश ; अधिकाऱ्यांच्या हार-तुरे, सत्कारावर ‘चाप’
सीईओ स्वामी यांचे सर्व विभागप्रमुख व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आदेश. जिल्हयातील विविध कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्र व इतर शासकीय विभागांना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी प्रशासकीय कामकाजानिमित्त भेटी देत असतात, सदर भेटी हया प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने तपासणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. तथापि बऱ्याच ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे पुष्पहार, शाल-श्रीफळ देवून स्वागत करण्यामध्ये खूपच वेळ आणि शिवाय या…
-

वर्गणी बंद | महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘या’ संस्थेचा निर्धार.!
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिटी फायटर्स युथ फौंडेशन संचलित श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळातर्फे जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. उत्सवानिमित्त सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा मल्लिकार्जुन मंदीर येथे ठेवण्यात आली होती. यासभेस मोठ्या संख्येने संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या सभेत सर्वानुमते जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा…