Big9news Network
आज दि.20 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1569 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज गुरुवारी 20 मे रोजी ग्रामीण भागातील 1569 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 913 पुरुष तर 656 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1575 आहे. यामध्ये 927 पुरुष तर 648 महिलांचा समावेश होतो. आज 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 10394 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8825 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply