Big9news Network
जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांची सोलापूर जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांची सोलापूर जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, निवडीचे पत्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे यांच्या हस्ते गोडसे यांना देण्यात आले.
त्याप्रसंगी उत्तमराव माने विभागीय अध्यक्ष, प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष, टी. आर. पाटील जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग उपस्थित होते. या निवडी बद्दल गोडसे यांचे जिल्हा परिषदेत व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a Reply