दिनांक २३/०७/२०२१ रोजी सोलापूर शहर पोलीस आस्थापनेवरील ए.एस.आय. ते पोलोस उप-निरीक्षक पदावर पदोन्नती होवून इतर आस्थापनेवर बदली झालेल्या पोलीस अधिकान्यांचा सत्कार समारंभ पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे यांच्या हस्ते व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री बापू बांगर, पोलीस निरीक्षक श्री जे. एन. मोगल यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बढती मिळालेले पोलीस उप निरीक्षक श्री धर्मपाल नारायण सांगळे (पोलीस मुख्यालय), श्री विलास गोविंद राठोड (पोलीस मुख्यालय), श्री भारत उत्तम रोकडे (पोलीस मोटार परिवहन विभाग), श्री गणेश तुळशीराम शिंदे (सलगर वस्ती पोलीस ठाणे), श्री अनिल विठ्ठल वळसंगे (पोलीस मुख्यालय) यांचा सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री बापू बांगर यांनो पदोन्नती प्राप्त पोलीस अधिकान्यांना त्यांच्या भावी कारकिदीसाठी शुभेच्छा दिल्या.