Big9News Network
ऊसातील खोडवा हे पीक कमी खर्चात जास्त पैसे मिळवून देणारे पिक असल्याची माहिती
झुआरी ॲग्रो केमिकल्स कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी विक्रम लाड यांनी दिली. अक्कलकोट येथील चुंगी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
जय किसान कंपनी तर्फे किसान दिन चुंगी येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रगतशील शेतकरी नंदकुमार चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.खोडवा ऊस पिकाचे ५ सुत्री व्यवस्थापन, कमी खर्चात उसाचे विक्रमी उत्पादन, एकरी ८० टनाच्या पुढे खोडवाचे उत्पादन घेण्याची पद्धत याचं सविस्तर मा्गदर्शन कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी विक्रम लाड यांनी केले. या वेळी कंपनीचे जगदीश पाटील, कृषी सल्लागार संकेत भोज,गावचे पोलिस पाटील संतोष पाटील,विश्वनाथ भोसले , आणि खत विक्रेते उपस्थित होते.
‘झुआरी’च्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आणि त्याचा उपयोग होतो अशी प्रतिक्रिया या यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply