Big9news Network
मागील काही काळापासून जिल्हा परिषद आवारात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या लावण्यासाठी सुध्दा अडचण निर्माण झाली होती. ही बाब माध्यमांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी कार्यालयात आल्यानंतर तातडीने खातेप्रमुखांना बरोबर घेऊन सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषद आवारात फेरफटका मारुन पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार, ग्रामपंचायत विभाभाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई, शाखा अभियंता चौगुले उपस्थित होते.
यावेळी सीईओ स्वामी यांनी पार्किंग व्यवस्था अडचण होणार नाही अशारीतीने सुरळीत कशाप्रकारे करता येईल याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पार्किंग व्यवस्थेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे यावेळी सीईओ स्वामी यांनी सांगितले.
Leave a Reply