राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने जिल्हा परिसरात संसर्ग वेगाने वाढत आहे.
आज दि.26 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1320 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 20 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज सोमवारी 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1320 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 825 पुरुष तर 495 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 891 आहे. यामध्ये 541 पुरुष तर 350 महिलांचा समावेश होतो. आज 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 6129 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4809 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.