Big9news Network
काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, रवी पाटील यांच्यासह अनेक भक्तांनी शनिवारी भेट घेतली. शिवाचार्यांनी काशीसह होटगीचाही कारभार पाहावा यासाठी आग्रह धरला. शिवाचार्यांनी भक्तांची विनंती मान्य करीत दोन्ही मठांचा कारभार पाहू असे सांगितले.
काशीपीठाचे उत्तराधिकारी म्हणून डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची नुकतीच निवड झाली आहे. शिवाचार्यांनी होटगी मठाचा कारभार पाहावा यासाठी भक्त आग्रही होते. अक्कलकोट रोडवरील मठात शनिवारी भक्त एकत्र आले.
यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य, काडसिध्देश्वर मठाचे नणवीरकेरी बसवेश्वर शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीशैलम् आणि केदार मठाचे मठाधिपती ज्या पध्दतीने आपल्या मठाचा कारभार पाहून काशीचे काम पाहतात त्याच पध्दतीने डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्यांनीही काशीसह होटगीचे काम पाहावे अशी विनंती भक्तांनी केली.
शिवाचार्यांनीही विनंती मान्य केली. यावेळी काँग्रेसचे दक्षिण अध्यक्ष हरीश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, नगरसेवक नागेश भोगडे, सुनील कामाटी, उदय पाटील, पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, चन्नवीर दुलंगे, सिध्दय्या स्वामी आदी उपस्थित होते.
Leave a Reply