माढा | माढेश्वरी देवीच्या मूर्तीला वज्रलेप ;15 दिवसात पूर्ण

Big9news Network

शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी

माढा शहराचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीच्या मूर्तीला 10 डिसेंबर ते 25 डिसेंबर या 15 दिवसाच्या कालावधीत माढेश्वरी देवीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आले या कालावधीत भाविकासाठी मुळ मुर्तीचे दर्शन बंद करण्यात आले होते. माढा शहरातील देवीचे मंदिर हे ऐतिहासिक आहे.

माढेश्वरी देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक येतात. मूर्तीच्या चेहऱ्यावरील तेज भाविकांना आध्यात्मिक समाधान देते. नवसाला पावणारी व जागरूक देवी अशी मोठी प्रसिद्धी देवस्थानला आहे.त्यामुळे यापूर्वीही देवीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होते यापूर्वी केलेल्या वज्रलेपाचे साधारण 12.50 किलोचा थर मूळ मूर्ती वरून काढण्यात आला आहे आणि नव्याने वज्रलेप ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

मूर्तीच्या वज्रलेपा बरोबर मुख्य गाभाऱ्यातील ही बदल करण्यात आला आहे. मुख्य गाभारा भींती वरील पूर्वी बसवण्यात आलेली स्टाईल फरशी काढून मूळ दगडी भिंतीला ऐतिहासिक व पौराणिक स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे श्री माढेश्वरी देवीचे मूर्ती मोहक व आकर्षणा मध्ये भर पडली आहे. ही सर्व प्रक्रिया 25 डिसेंबरला पुर्ण करुन मंदिर भाविकासाठी खुले करण्यात आले आहे.यावेळी महापुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मुर्तीच्या पाठीमागे लाइट्स व पौराणिक सजावटीमुळे गाभाऱ्यातील ते मनमोहक दृश्य पाहून भाविकांमध्ये चैतन्य व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे यापुढेही मूळ मंदिराची पुरातत्व विभागाकडून मार्गदर्शन घेऊन मंदिराची डागडुजी करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वज्रलेप केल्यामुळे मूर्ती सुरक्षित राहून मूर्तीच्या आयुष्य वाढणार आहे.