मराठा सेवा संघ आयोजित आॕनलाईन शैक्षणिक व्याख्यानमालेची सांगता

Big9news Network

सोलापुर प्रतिनिधी

मराठा सेवा संघाच्या वतीने १७ जून राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीदिन ते २६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती या कालावाधित शैक्षणिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.. सध्या सुरु असलेल्या आॕनलाईन शिक्षणानुमुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक बऱ्याच अंशी संभ्रम व अनामिक भितीच्या सावटामधे आहेत. त्यांच्या मनातील ही भिती व संभ्रम निघून जावा , तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध विषयांचे मार्गदर्शन आयोजित केल्याची माहीती जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. यावेळी सदाशिव पवार,डॉ.जी.के.देशमुख,जीवन यादव, संजय जाधव, आर पी पाटील आदी उपस्थित होते.

शैक्षणिक व्याख्यानमालेत किरण बाबर, सौ प्रितम तावरे श्रीपादराव जगदाळे, प्रा.डॉ उमेश मुगळे,प्रा.उमाशंकर रावत विजयकुमार नागटिळक, लक्ष्मण काटकर, प्रा.अर्चना कदम, सौ.मधुरा सुरवसे व कु स्वराली पाटील या मान्यवरांनी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

या शैक्षणिक व्याख्यानमालेचा शिवारंभ जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आला. उदघाटन सत्रामधे जिल्हा लेखाधिकारी विशाल पवार , उत्तमराव माने , नंदा शिंदे , दत्ता मुळे विजय नागटिळक , यांची उपस्थित होती.

प्राथमिक विभाग वाचन कला, माध्यमिक विभागासाठी गणित सायन्स , यासह अभ्यास पद्धती , दहावी बारावी नंतरच्या वाटा, परदेशातील शिक्षण व नोकरीच्या संधी, शिष्यवृत्ती परिक्षा व नवोदय विद्यालय प्रवेश या विषयावार उपयुक्त मार्गदर्शन केले.

राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी सांगता सत्र झाले यावेळी मनोरमा बँकेच्या संचालिका सुनिता पाटील, शिवशाहूसेनेचे उपाध्यक्ष युवराज पोटरे, जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
झुम अॕपवरुन मिटींग घेऊन यु ट्युब लाईव्ह केल्याने अनेकांना याचा फायदा घेता आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष उज्वला साळुंके, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोमनाथ राऊत, वी.भ.वि,परिषद अध्यक्ष परशुराम पवार, शि.म.डॉ.पं.दे.शिक्षक परिषदेच्चे अध्यक्ष जीवन यादव , महीला आघाडीच्या शुभांगी निंबाळकर, दत्तात्रय मस्केसर हणमंत पवार कामिनी भोसले यांचे सहकार्य लाभले तर विशेष तांत्रिक सहकार्य विजय नागटिळक व प्रतिक पाटील यांचे लाभले.