निसर्गोपचार शिबीर व निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन संपन्न

Big9news Network

पश्र्चिम मंगळवार पेठ ,मीठ गल्ली येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या हॉलमध्ये आज निसर्गोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होत जाणारे दुर्लक्ष व त्या अनुषंगाने जडणार्या व्याधी हा विषय गंभीर होत चालला आहे. माणुस कधीच अचानक आजारी पडत नाही.
वेळेवर शरिराने दिलेले संकेत ओळखले तर निसर्गात उपलब्ध गोष्टींचा वापर करुन माणुस ठणठणीत बरा होऊ शकतो. यासाठी निसर्गात उपलब्ध वनस्पती, भाज्या यांची माहिती असणं गरजेचं आहे.

सोलापुरातील प्रदिर्घ अनुभव असलेले निसर्गोपचार तज्ञ श्री क्रांतीवीर महिंद्रकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याच वेळी महिला निसर्गोपचार तज्ञ डॉ सौ गायत्री हजारे यांनी महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे , घरातील महिला जर आरोग्यसंपन्न असतील तर त्या घरात आजार शिरकाव करु शकत नाहीत असे विषद केले.

श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीकिसन करवा यांनी आता खरी गरज आरोग्य असुन माणसाने निसर्गाकडे वळल पाहिजे हे विविध उदाहरणातुन उपस्थितांना समजाऊन दिले.

याच ठिकाणी कायमस्वरूपी निसर्गोपचार केंद्र सुरू होत आहे.
सकाळच्या वेळी श्री महिंद्रकर व सायंकाळी डॉ सौ हजारे हे रुग्णांना तपासणार आहेत. श्री सोमशेखर बुक्का हे ॲक्युप्रेशर ट्रिटमेंट देणार आहेत. या निसर्गोपचार केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुरजरतन धुत यांनी प्रास्ताविकेत सांगितले.श्री रामानुज होलाणी यांनी सुत्रसंचलन केले.का र्यक्रम सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री दुर्गाप्रसाद मिणीयार , श्री पुरुषोत्तम बागडी, श्री सुहास लाहोटी, श्री मधुसूदन कालाणी यांनी परिश्रम घेतले.