Big9news Network
महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार, शिक्षणमहर्षी सिद्रमाप्पा नागप्पा आलुरे गुरुजी यांचे ९० व्या वर्षी सोमवारी पहाटे निधन झाले आहे. त्यांना मराठवाड्याचे प्रती सानेगुरुजी असेही संबोधले जात होते.
सोलापूर येथे उपचारादरम्यान पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवारी दुपारी तीन नंतर अणदूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1980 ते 1985 या दरम्यान आलुरे गुरुजी तुळजापूरचे आमदार म्हणून कार्यरत होते. यादरम्यान ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक होते, राज्य सहकारी बँक संचालक, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन, बसवेश्वर शिक्षण संस्थेलातूर संचालक, बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष, तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चेअरमन, तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त, अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाच्या वार्तेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply