Big9news Network
पुणे महानगरपालिका प्रमाणे सोलापुर महानगरपालिकामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करा : आनंद चंदनशिवे
सोलापुर : पुणे महानगरपालिका प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये खरेदी करणे बाबत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका ज्योती बमगोंडे माकपा च्या नगरसेविका कामिनी आडम यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्री पि. शिवशंकर साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे सोलापूर शहरांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. पुणे महानगरपालिकेने 25000 रेमडिसिविर इंजेक्शन खरेदी केले असून त्यातला 1टप्पा 800 रेमडिसिविर इंजेक्शन पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला असून या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेने आरोग्याधिकारी कार्यलये ,औषधे रसायने उपकरणे खरेदी या बजेटहेड अंतर्गत 50 लाख 50 हजार असून व अन्य भांडवली कामाच्या हेड वरील तरतुदीत बदल करून 25000 रेमडिसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे ,गणेश पुजारी ,
सौ.ज्योती बमगोंडे नगरसेविका व माकपा च्या कामिनीताई आडम एम आय एम चे रियाज खैरादी श्री विजय बमगोंडे श्री मोहन कोकुल भीमा इंगळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply