BIG 9 NEWS NETWORK
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दीपावलीच्या पावन मुहूर्तावर अक्कलकोटचे संगीत अलंकार मनोहर देगावकर व सहकारी यांच्या भक्तिमय पहाट गाण्यांचा स्वराविष्कार सादर होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. पहाट गाण्यांचा कार्यक्रम दिनांक ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर अखेर वटवृक्ष मंदिर परिसरात सादर होणार आहे. दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते सकाळी ८, दिनांक ५ रोजी सायंकाळी ५ ते ७, दिनांक ६ रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत संपन्न होणार आहे. या भक्तीमय पहाट गाण्यांच्या स्वराविष्कार माध्यमातून स्वामी भक्तीची मेजवानी भाविकांना लाभणार आहे. वरील सर्व कार्यक्रम देवस्थान परिसरात नियोजीत तारखेस व वेळेवर संपन्न होतील, तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
Leave a Reply