Big9news Network
मोहोळ- पंढरपुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडल्याबद्दल टाकळी सिकंदर येथील चौकात सर्व शेतकऱ्यांचे पवन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित शेतकरी संघटना, प्रहार संघटना, रयतक्रांती शेतकरी संघटना व पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांच्या समवेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
कालच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी कोणाचीही वीज कनेक्शन तोडू नये असा निर्णय दिला होता तरी सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तब्बल दोन ते चार तास राज्य मार्ग पंढरपुर-सोलापुर रस्ता अडवला होता.
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावीतरणच्या सर्वच अधिका-यांना धारेवर धरले होते संतप्त झालेले शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम दिसत होते.तरी संबंधीत वीज वीतरणचे अधिकारी काळवांदे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत आठ तास वीज सुरू राहील व यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आडचण होणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी पवन महाडिक, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरन देशमुख, रयतक्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार, प्रा.संग्राम चव्हाण, नितीन चव्हाण, संदीप देवकते, राजाराम बाबर,भारत पाटील, संतोष चव्हाण, झाकीर मुलाणी, शिवाजी लोमटे,माजी पसमिती सदस्य चंद्रकांत व्होणकळस, संतोष बचुटे,रामा चव्हाण,भीमा परिवारातील सर्व मान्यवर तसेच वीज वितरण कंपनीचे मोहोळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी पवार, पंढरपुर विभागाचे वरिष्ठ अधिकारी भुतडा, सिद्धेश्वर म्हमाणे, सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी काळवंदे, सर्व अधिकारी उपस्थित होते
व टाकळी सिकंदर,पुळूज,पुळूवाडी,नळी, आंबेचिंचोली, विटे, पोहोरागाव, खरसोळी, तारापूर पंचक्रोशीतील आदी सर्व मान्यवर,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply