Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी ई-मेल द्वारे केली आहे. वाटेगाव (ता.वाळवा) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांनी मराठी साहित्यातील लोक वाड:मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्वच क्षेत्रात दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे. साहित्यासह लोककलांचे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहेत. तसेच तमाशा कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी लोकांमधून मोठी जनजागृती केली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्येही त्यांनी शाहिरीतून मोलाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून रशियापर्यंत पोहवण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले. 1 ऑगस्ट 2020 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते साहित्य क्षेत्रातील कर्तृत्व व त्यांची किर्ती पाहता भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी राज्य शासनाकडून शिफारस होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विधानसभा व विधान परिषदेत ठराव होणे महत्त्वाचे असते.

मात्र, कोरोनामुळे ते शक्‍य नसल्याने राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेड च्या वतीने मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती पाठवत सर्वोच्च पुरस्कार देण्याची विनंती केली आहे. गेल्या दहा वर्षापासून संभाजी ब्रिगेड सातत्याने ही मागणी करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *