Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

आज मंगळवारी दि.20 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 93 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 62 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 327 आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1613 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1520 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 29 हजार 127 इतकी झाली आहे. यामध्ये 18,000 पुरुष तर 11,127 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 842 जणांचा मृत्यू झाला आहे यात 596 पुरुष तर 246 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 322 आहे .यामध्ये 2 हजार 443 पुरुष तर 879 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 24 हजार 963 यामध्ये 14,961 पुरुष तर 10,002 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 9 तर ग्रामीण 7

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 0

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 8

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 24

मंगळवेढा – नागरी 2, ग्रामीण 2

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 6

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 4 ग्रामीण 13

सांगोला – नागरी 4 ग्रामीण 11

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी – 18 तर ग्रामीण भागात 93 असे एकूण 111 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *