Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..
  • Big9news Network

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आयात उमेदवारांपेक्षा ज्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली अन् तग धरुन आहे अशा निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली जाईल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी नवनियुक्त संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्याप्रसंगी बरडे बोलत होते. यावेळी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शहर मध्यचे नुतन उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, प्रसिध्दीप्रमुख निरंजन बोध्दुल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

येथील प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल पक्षातील वरिष्ठांना सादर करणार असल्याचे संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे यांनी सांगितलं.
पक्षाने पदाच्या रुपात जबाबदारी दिली असून मजबूत पक्षबांधणी करुन या मतदारसंघातून शिवसेनेचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणणे हेच ध्येय असल्याचे मत नुतन उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर यांनी मांडले.

या बैठकीस उपशहरप्रमुख धनराज जाधव, रविकांत कांबळे, रेवण बुक्कानुरे, चंद्रकांत मानवी, धनराज जानकर, अनिल दंडगुले, प्रशांत कदम, अंबादास चव्हाण, बालाजी विठ्ठलकर, दशरथ पाथरुट, रविकांत गायकवाड, सुशील कन्नुरे, राज पांढरे आदींसह शिवसेनेचे शहर मध्य मधील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *