युवा नेते सुदीप चाकोते यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

आज नवी दिल्ली येथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व श्री राहुल गांधी यांच्या आदेशानुसार व कॉंग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री लालजीभाई देसाई यांच्या सूचनेनुसार सुदीपदादा चाकोते यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देण्यात आले.
मागील दोन वर्षांपूर्वी श्री सुदीप दादा चाकोते यांना पश्चिम महाराष्ट्राचा पदभार देण्यात आला होता.या काळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संघटना बळकट केली. प्रत्येक जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी नेमून कामाला गती दिली.विविध आंदोलने, मेळावे या द्वारे जनतेचे प्रश्न वरीष्ठ पातळीवर मांडून त्यांची तड लावली.अनेक शहरात व राज्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर देखील आयोजित केले.मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्यांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी प्रचारात हिरीरीने भाग घेतला.त्यांच्या या सर्व कार्याने प्रभावित होऊन पक्षाध्यक्ष सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांनी त्यांचे नाव लालजीभाईना निश्चित करण्याचे आदेश दिले.


निवड झाल्यावर सुदीपदादा चाकोते यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी व लालजीभाई देसाई यांनी प्रदेशाध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसचे सुशीलकुमार शिंदे, HK पाटीलजी, नाना पाटोळे, विश्वनाथ चाकोते, प्राणिती शिंदे,लालजी मिश्रा विलासजी औताडे यांचे धन्यवाद केले व येणाऱ्या काळात काँग्रेस ला बळकट करून त्याचे गतवैभव मिळून देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणार असल्याचे ग्वाही दिली.