Big9news Network
सोलापूर शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी शहर व जिल्ह्यात उद्या शनिवार दि. 8 पासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या संदर्भात काल गुरुवारी (दि.6) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त जिल्हा परिषदचे सीईओ, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.
उद्या शनिवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सोलापूरातील नागरिकांनी आज शुक्रवारी सकाळपासूनच किराणा माल व भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सोलापूरातील अनेक ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. लोकांमध्ये उद्या शनिवार (दि.8) दुकान चालू की बंद याबाबत संभ्रमावस्था दिसून येत आहे.
आज सकाळी अशी होती परिस्थिती –
सोलापूर शहर व जिल्ह्यात शनिवारी (दि.8) रात्री 8 पासून कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी 7 ते 11 पर्यंत भाजीमार्केट व किराणा दुकान चालू राहणार आहे. त्यामुळे लोकांनी खरेदीबाबत चिंता करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टन्स व मास्कचा वापर करून गर्दी न करता लोकांनी खरेदी करावी असे यावेळी सांगण्यात आले.
उद्या शनिवारी 8 मे पासून 15 मे पर्यंत वैद्यकीय सेवा सोडून सर्व बंद असणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे. मात्र नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलतीसाठी उद्या 7 मे शुक्रवार आणि 8 मे, शनिवारी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. तरी शहरातील नागरिकांनी गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.