Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथील अंगणवाडी सेवीका यशोदा सोळगे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करुन निरोप देण्यात आला. त्यांनी 36 वर्ष सेवा बजावली असून त्यांचे लहान मुलांवरील प्रेम, शिकवण्याच्या सोप्या पद्धतीमुळे लहान मुलांना देखील शिक्षणाची चांगली गोडी लागली होती. गेली ३६ वर्षे सेवा केल्याने ३६ बॅच त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने घडल्या आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं.स. सदस्य कालिदास गावडे म्हणाले की, मुलांच्या शिक्षणाचा पाया अंगणवाडीमध्ये बनत असतो. भविष्यात तो जो कोणी होईल याचे सगळे श्रेय अंगणवाडीच्या ताईंना जाते. आणि सोळगे यांनी ३६ वर्षे सेवा केली म्हणजे अतिशय कौतुकास्पद असुन येणाऱ्या काळात त्यांच्याहातुन घडलेल्या पिढ्या नक्कीच सार्थकी लागतील.

दरम्यान सोळगे यांना निरोप देताना हाताखालुन घडलेले विद्यार्थी भावुक झाले होते. आपल्याला बाईंनी शिकविले म्हणून अनेक विद्यार्थी मानाचा सत्कार करण्यासाठी उपस्थित होते. सत्कारामुळे सोळगे या भारावुन गेल्या होत्या.

या कार्यक्रमाचे आयोजन वि.का.सोसायटी चेअरमन मोहन चौगुले यांनी केले होते. यावेळी रयत फाउंडेशन चे श्रीकांत डोंगरे, विजय व्यवहारे, संजय पाटील, बालाजी पाटील, रमेश चौगुले, प्रभाकर चौगुले, किरण व्यवहारे, लहू व्यवहारे, धनाजी व्यवहारे, संभाजी नरळे, हरिदास व्यवहारे, भीमराव व्यवहारे, प्रमोद व्यवहारे, अंगणवाडी सेविका अलका व्यवहारे, इंदुमती चौगुले, रेखा डोंगरे, बकुळा पाटिल, लतिका व्यवहारे सह गावातील ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *