‘अर्थार्जनातून स्वाभिमानी शिक्षणाचा वसा विद्यार्थ्यांनी घ्यावा’ : आ. सुभाष देशमुख

Big9news Network

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील १० वी १२वी उत्तीर्ण प्रथम ३ क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थचे संस्थापक मार्गदर्शक श्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक श्री सुभाष बापू देशमुख हे होते. संस्थचे वतीने प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी कु चैतन्या कोल्हाळ हिने राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले याबाद्द्ल तिचा सन्मान करण्यात आला. १० वी मधील प्रिया बनसोडे (प्रथम ८९.२०%), पार्थ कसबे (दुसरा ८६. ६०%), अजय पवार (तृतीय ८०%) तर कनिष्ठ महाविद्यलयातील विज्ञान शाखेचे संग्राम अतकरे (प्रथम ९७%), कार्तिक सरडे (प्रथम ९७%), विद्या केसरे (दुसरी ९६%), सरस्वती साळुंखे (तृतीय -९४. ५०%) तसेच वाणिज्य शाखेतील अनुराधा काळे (प्रथम ८८. ५०%), यश गायकवाड (द्वितीय -८८%), मोहिनी जाधव (तृतीय ८६. ८३%) याचबरोबर लोकमंगल सायन्स अकादमी च्या वतीने १० गुणवंत विद्यर्थ्यांना प्रत्येकी रु. १ लाखाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.प्रातिनिधिक स्वरूपात कु. श्रावणी वाघमारे या विद्यर्थिनीचं या निमित्ताने सन्मान करण्यात आला.

 

सदर कार्यक्रमात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये श्रुष्टी पुजारी (प्रथम ८९. ९३%), दर्शन लोखंडे (द्वितीय ८९. ६३%), यश अवसेकर (तृतीय ८८.८९%),रुपाली वाघमोडे (चतुर्थ ८८. ८३%), रितीश बनसोडे (पाचवा ८८. ४१%) आदी विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. यानिमित्ताने संवाद साधताना सुभाष बापू देशमुख म्हणाले कि, विद्यर्थ्यांना / पालकांना शिक्षणाचा आर्थिक ताण येऊ नये तसेच माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थी हा स्वाभिमानी जिद्दी संस्कारी कर्तृत्व संपन्न आणि अनुभव समृद्ध व्हावा का संस्थेचा संकल्प या दृष्टीकोनातून गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी करणे हि आमची जबाबदारी आहे. यादृष्टीकोनातून संस्था कार्य करत आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिष्यवृत्ती, अनुभव, कौशल्य वृद्धी हि संस्थची चतुसूत्री त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जितेंद्र कंदले यांनी केले तर सूत्रसंचालन राधिका घाटगे आणि सविता पाटोळे यांनी केले यानिमित्ताने सायन्स अकादमी चे श्री संतोष तोडकर यांनी फौंडेशन अभ्यासक्रम शिष्यवृत्ती परीक्षा याचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रमास प्रा.गणेश गायकवाड, प्रा बसवराज, श्री सुरज चव्हाण श्री इंद्रजित चव्हाण श्री नंदकुमार स्वामी, श्री प्रशांत जुंजा, नफिसा तांबोळी, दीपाली शिंदे, अपर्णा माशाल यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य श्रीकांत धारूरकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून केला.