जगदंब बियर शॉप वर कारवाई ; देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

Big 9 News Network

सोलापूर (प्रतिनिधी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील जगदंब बिअर शॉपीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.याप्रकरणी आरोपी मल्लिनाथ राम माने (वय-३०,रा.बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर याला अटक करण्यात आली असून,त्याच्याकडून ५३ देशी विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या असा मिळून एकूण सहा हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड,सचिन वाकडे,सलीम बागवान,लालसिंग राठोड,परशुराम शिंदे,अजय वाघमारे यांनी पार पाडली.