या पुढेही पद्मशाली गोडवा वाढवूया ; ‘श्रीमार्कंडेय’चा उपक्रम

Big9news Network

फाउंडेशनतर्फे आजपर्यंत समाजोपयोगी उपक्रम राबवित समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. आजच्या उपक्रमातून एकोपा वाढावी म्हणून आपण सर्वच एकाच व्यासपीठाखाली आलो आहोत. आपण सर्वजण एक होण्याचा निर्णय घेतला तरी, काही जण त्यात खो घालण्याचा प्रयत्न करत राहतात. अशा लोकांना वेळीच ओळखावे. अॅड. रामदास सब्बन यांचे औद्योगिक बॅंक न्यायालयीन लढाई संदर्भात स्तुत्य असून तसेच भविष्यात आयटी पार्क करण्याचे प्रयत्न सुरु असून औद्योगिक बॅंक आणि आयटी पार्क लवकरात लवकर सुरु झाल्यास समाजातील युवकांमध्ये जमेची बाजू होईल. समाजात शिक्षित वर्ग मोठा असून भविष्यात त्याचा फायदा होईलच. दिवाळीचा गोडवा, यापुढे पद्मशाली समाजाची गोडवा वाढवूया असे प्रतिपादन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी केले आहे.


श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘आपण सर्वजण एक होऊया, दिवाळीचा गोडवा वाढूया’ ..! या अनुषंगाने “दिवाळी स्नेहबंधन” कार्यक्रम रविवारी सकाळी सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. तसेच पद्मशाली समाजात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या अॅड. डॉ. रामदास सब्बन, मिसेस इंडियाच्या मानकरी शिल्पा आडम, सोलापूर आकाशवाणी केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी, आरोग्यदूत अंबिका मिठ्ठापल्ली आणि सामाजिक कार्यकर्ते एमजे मोहन तलकोकूल यांचा सोलापूरी टॉवेल, नॅपकीन बुके पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी, मुरलीधर आरकाल, महापौर श्रीकांचना यन्नम, समाजाचे अध्यक्ष महेश अण्णा कोठे, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, उद्योजक भूपती कमटम,ज्येष्ठ विधिज्ञ जी. एस. आडम, एमराया फार्मास्युटिकल्स आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, नगरसेवक प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते.

सुरुवातीला कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे नक्षत्र आरती करण्यात आले. पौरोहित्य पुरोहित राघवेंद्र आरकाल यांनी केले. अॅड. सब्बन, सौ. आडम, दासरी यांनी सत्काराला उत्तर दिले. गड्डम यांनीही मनोगत व्यक्त केले. महेश अण्णा कोठे पुढे म्हणाले, आज पूर्व भागात बॅंका-मिल बंद आहेत. जर पुर्नवैभव आणण्यासाठी सर्वांनीच एक होणे आवश्यक आहे. जर कोणी आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, लगेच ओळखता आले पाहिजे. मग पुन्हा सोन्याचा धूर निघत राहील.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे प्रा. अनुप अल्ले, बालाजी कुंटला, उपाध्यक्ष श्रीनिवास कामुर्ती, किशोर व्यंकटगिरी, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आले. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे निमंत्रित सदस्य नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. प्रास्ताविक फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा यांनी केले.

या कार्यक्रमास पद्मशाली ज्ञाती संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दयानंद कोंडाबत्तीनी, संतोष सोमा, रायमल्लू कमटम, राम गड्डम, महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष राजमहिंद्र कमटम, उद्योजक गणेश बुधारम, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबू गंधमल, अमृतदत्त चिनी, श्रीनिवास मडूर, पिंपरी चिंचवड येथील पद्मशाली समाजाचे सरचिटणीस उमेश सिलगारी, पुरुषोत्तम पोबत्ती, सुकुमार सिध्दम, विनोद केंजरला, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सरचिटणीस अंबादास कुडक्याल, ‘अतुल्य’चे सदस्य प्रशांत कुडक्याल, हरिनिवास बिल्ला, पद्मशाली इंजिनिअर असोसिएशनचे रोहन कुर्री, परशुराम संदुपटला, दामोदर पासकंटी, अनिल देवनपल्ली, लक्ष्मीनारायण दासरी, श्रीरंग रेगोटी, नागेश बोमड्याल, सुर्यकांत जिंदम, गोविंद चिंता, सिध्देश्वर पुंजाल, मोहन वड्डेपल्ली, श्रीनिवास आडम, बालराज दोंतूल, नागेश बंडी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गड्डम, कमटम, पेनगोंडा, बुरा यांचे सहकार्य लाभले.

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहबंधन कार्यक्रम आयोजित प्रसंगी अॅड. डॉ. रामदास सब्बन, मिसेस इंडियाच्या मानकरी शिल्पा आडम, सोलापूर आकाशवाणी केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी, आरोग्यादूत अंबिका मिठ्ठापल्ली, सामाजिक कार्यकर्ते मोहन तलकोकूल यांना गौरविण्यात आले. त्याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष महेश अण्णा कोठे, विश्वस्त जनार्दन कारमपुरी, मुरलीधर आरकाल, उद्योजक पेंटप्पा गड्डम, भूपती कमटम, एमराया फार्मास्युटिकल्सचे एमडी गणेश पेनगोंडा, नगरसेवक प्रथमेश कोठे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबू गंधमल, नागेश सरगम, संतोष सोमा, आदी समाज बांधव दिसत आहेत.