‘शाळेचे सुंदरता झाडांमुळे’ – महेबुब तांबोळी

Big9news Network

आज कोरोनामुळे सगळ्यांना कळून चुकले आहे की ऑक्सिजन किती महत्त्वाचे आहे व आपल्याला निसर्गाकडून ऑक्सिजन भरपूर मिळावे यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. झाडांमुळे शाळेची सुंदरता वाढते व वातावरण आनंददायी होते. असे प्रतिपादन अध्यक्ष जनसेवा शिक्षक संघटना व अखिल भारतीय उर्दु प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने मनपा मुलींची उर्दु शाळा क्रमांक 3सोलापूर येथे वृक्षारोपण करताना महेबुब तांबोळी म्हणाले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका नजमुन्निसा बेद्रेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कलाशिक्षक फैय्याज शेख यांनी केले. कार्यक्रमास रेहाना शेख ,इम्रान पठाण ,नफिसा बागवान, नईम मुछाले, पार्वती स्वामी ,लतीफ भाई उपस्थित होते शिक्षिका जीनत पटेल यांनी संघटनेचे व शिक्षकांचे आभार व्यक्त करून झाड जोपासण्याचे आश्वासन दिले.