राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करण्याऱ्या शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ह्या पुरस्काराला आजपर्यंत कोणतेही नाव देण्यात आलेली नाही. दरवर्षी देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्काराचे नामकरण महात्मा जोतीराव फुले शिक्षक पुरस्कार असे करण्यात यावे. अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहीती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व प्रदेशसचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
महात्मा ज्योतीराव फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरिव योगदानाबद्दल त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल जोतिराव फुले यांनी ‘स्त्री शिक्षणा’चा प्रचार प्रसार केला.शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहचवली.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्युच्य आहे.म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमींची मागणी लक्षात घेवून आपण शिक्षक दिनी दिल्या जाणाऱ्या शिक्षक पुरस्काराला महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार असे नाव द्यावे अशी आपणास सदरील निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण,कार्याध्यक्ष दयानंद जाधव,जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे,अनिल गायकवाड,शहाजी रंदवे,राजकीरण चव्हाण,,विशाल पवार,प्रकाश बाळगे,संतोष भद्रशेट्टी,संतोष रजपुत,,दिपक डांगे,धन्यकुमार स्वामी आदींच्या सह्या आहेत.
Leave a Reply