Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ‘चेंबूर’च्या धर्तीवर छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण कार्याचा शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी चंद्रकांत वानकर,शहाजी पवार, अमोल  शिंदे, देवेंद्र कोठे,दास शेळके, प्रताप चव्हाण,श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, राम गायकवाड,समाधान आवळे ,नगरसेविका मंदाकिनी पवार ,स्वाती आवळे, शशी थोरात ,देविदास चेळेकर,श्याम कदम ,सुहास कदम, राज सलगर आदी जण उपस्थित होते यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांचा मान्यवरांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला .

मराठा क्रांती मोर्चा चे समनव्यक राम जाधव आणि किरण पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर चेंबूरच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी निवेदन देऊन पाठपुरवठा केला होता. याची दखल घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी 87 लाख रुपये  मंजूर केले होते .

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण व्हावं यासाठी राम जाधव, किरण पवार हे प्रयत्नशील होते. चेंबूर परिसरात असलेल्या छत्रपतींच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण धर्तीवर सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर होण्यासाठी या दोघांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केला होता. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना या संदर्भात निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

असे असेल सुशोभीकरण… 

पालकमंत्री असताना ‘छत्रपती संभाजी महाराज पुतळा’ सुशोभीकरण करण्यासाठी 85 लाखाचा निधी दिला होता. संपूर्ण सुशोभीकरणाचा खर्च दोन ते अडीच कोटी पर्यंत जाणार आहे. आजपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विधान परिषदेचे आमदार तसेच, महानगरपालिका यांच्यामार्फत सुशोभिकरणाच्या कामाला निधी दिला जाईल. त्याचसोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सुशोभीकरण कामासाठी निधीची मागणीचे निवेदन देणार आहे. ज्याप्रमाणे चेंबूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण झाले. त्याच धर्तीवर याचे डिझाईन केले जाईल. सोलापुरात येणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रेरणास्थान असेल.
विजयकुमार देशमुख, आमदार

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला परंतु, उद्घाटनाचा कार्यक्रम छत्रपतींना मानणाऱ्या अठरापगड जातीतील सर्व लोकांना घेऊन भव्य प्रमाणात करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी दिली.
महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य प्रेरणास्थान येथे निर्माण होत आहे. यासाठी सर्व आमदार,खासदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. अभूतपूर्व असा उद्घाटन सोहळा सुशोभीकरणाच्या कामानंतर करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *