Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 314 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 200 पुरुष तर 114 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 231 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7704 इतकी झाली आहे. यामध्ये 4632 पुरुष तर 3072 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 213 जणांचा मृत्यू झाला आहे यात 146 पुरुष तर 67 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2980 आहे .यामध्ये 1846 पुरुष 1134 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4511 यामध्ये 2640 पुरुष तर 1871 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट 4 बार्शी 70 करमाळा 16 माढा 22 माळशिरस 37 मंगळवेढा 11 मोहोळ 32 उत्तर सोलापूर 10 पंढरपूर 84 सांगोला 10 दक्षिण सोलापूर 18 असे एकूण 314 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अक्कलकोट 1, माढा 1,करमाळा 2,माळशिरस 2 ,उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर प्रत्येकी एक कोरोना बाधित व्यक्ती मरण पावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *