Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी ग्रामीण भागातील तब्बल 221 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 144 पुरुष तर 77 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 130 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1283 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1062 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 248 इतकी झाली आहे. यामध्ये 6 हजार 234 पुरुष तर 4 हजार 14 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 293 जणांचा मृत्यू झाला आहे यात 201 पुरुष तर 92 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 878 आहे .यामध्ये 1 हजार 930 पुरुष तर 948 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 7 हजार 77 यामध्ये 4103 पुरुष तर 2974 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट 10 बार्शी 24 करमाळा 7 माढा 54 माळशिरस 40 मंगळवेढा 1 मोहोळ 6 उत्तर सोलापूर 5 पंढरपूर 21 सांगोला 8 दक्षिण सोलापूर 45 असे एकूण 221 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

2 thoughts on “सोलापूर | ग्रामीण भागात वाढले नवे 221 ‘कोरोनारुग्ण’ ; दहा जणांचा मृत्यू

  1. हितचिंतक says:

    Report मधून काही पाने गहाळ आहेत.
    कृपया या गोष्टींवर लक्ष द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *