मुंबई दि. १ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ४६ हजार १७९ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार १८२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २३ कोटी ४७ लाख ५३ हजार १६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीत
अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख १७ हजार ४४८ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३४३ (८९२ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ११ हजार ३९८
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
जप्त केलेली वाहने – ९६,१०६
Leave a Reply