Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण
  • गुन्हा दाखल झाल्याच्या एकातासात चोरटे गजाआड
  • कामती पोलिसांची कारवाई

वाघोली:मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरबळी ता.मोहोळ येथे दिवसाढवळ्या शेळ्यांची चोरी करून चार चाकी वाहनाने पोबारा करणाऱ्या चोरट्यांना कामती पोलिसांनी एक तासात जेरबंद केले आहे.

पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग बबन राऊत,रा अरबळी ता.मोहोळ यांच्या राहत्या घरासमोरील तीन शेळ्यांची दोरखंड कापून कोणीतरी पाच लोक त्या शेळ्या चारचाकी स्कॉर्पिओ या गाडीतून  भरून नेत असताना गुरुवारी दि.१७ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास निदर्शनास आले.राऊत यांनी त्या लोकांना अडविण्याचा प्रयत्न केला.

Goat thief

दरम्यान या इसमांनी त्यांच्या हातातील तलवारीचा धाक दाखवून तिथून निघून गेले.त्या चारचाकी वाहनाचा नंबर पाहून त्यांनी कामती पोलीस ठाणे गाठले.वाहन क्रमांक एमएच ४५ ए ७६२२ या वाहनातून पाच चोरट्यांनी माझ्या घरासमोरील तीन शेळ्या चोरून पळाले असल्याची फिर्याद कामती पोलीसात दिली.

लागलीच कामती पोलीस ठाण्याचे सपोनि किरण उंदरे यांनी सोशल मीडियाचा वापर करत वाहनांची माहिती मागविण्यास सुरवात केली.या चारचाकी वाहनांसाठी कुरुल,कामती,कोरवली,बेगमपूर व सोहाळे या गावात पोलिसांनी सापळा लावेला होता.एका गुप्त महितीदारकडून अशा नंबरची गाडी सोहाळे मार्गे येत असल्याची बातमी कळताच सपोनि किरण उंदरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार,पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल नायकोडे व होमगार्ड हे सोहाळे चौकात आले.

स्कार्पिओ वाहन चालकांनी सोहाळे चौकातील पोलीस गाडी पाहताच गाडी सोडून पळून गेला तर इतर चारजण, वाहन व शेळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीची नावे १.)भोला उर्फ छोटा लाल्या काशीनाथ गायकवाड वय ३०,२)विनायक उर्फ विनोद सिद्राम जाधव वय २८ ३)मारुती विलास जाधव वय २८ ४)भारत चंद्रकांत गायकवाड वय ३९ सर्व जण रा.सेटलमेंट फ्री कॉलनी न.३ सलगर वस्ती सोलापूर अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

यांच्याकडून एकूण एक चारचाकी वाहन व तीन शेळ्या असा पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुन्ह्यातील चोरटे पकडण्यासाठी पोकॉ सुनील पवार,पोना मेहबूब शेख,राहुल दोरकर,पोहेकॉ अमोल नायकोडे,पोना बबलू नाईकवाडी,पोहेकॉ यशवंत कोटमाळे,पोहेकॉ बापू दुधे,पोकॉ मसलखांब आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि किरण उंदरे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *