अपडेट | जगभरातील 2 कोटी 31 लाख कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे

सोमवारी जगभरात 2 लाख 30 हजार 816 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 9 लाख 69 हजार 018 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 74 लाख 03 हजार 198 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 895 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 70 लाख 46 हजार 216 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 42 लाख 99 हजार 525 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 04 हजार 506 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 55 लाख 62 हजार 663 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 44 लाख 97 हजार 867 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 88 हजार 965 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 07 हजार 723 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 31 लाख 34 हजार 713 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.