Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी दि.27 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 435 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 258 पुरुष तर 177 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 215 आहे. आज 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 11 पुरुषांचा आणि 3 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 2319 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1884 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 996 इतकी झाली आहे. यामध्ये 14,784 पुरुष तर 9212 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 659 जणांचा मृत्यू झाला आहे यात 462 पुरुष तर 197 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6276 आहे .यामध्ये 4 हजार 232 पुरुष तर 2044 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 17 हजार 61 यामध्ये 10,088 पुरुष तर 6973 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 3 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 39 तर ग्रामीण 51

करमाळा –नागरी 6 ग्रामीण 27

माढा – नागरी 17 तर ग्रामीण 35

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 61

मंगळवेढा – नागरी 5 ,ग्रामीण 19

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 13

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 6

पंढरपूर – नागरी 31 ग्रामीण 48

सांगोला – नागरी 23 ग्रामीण 46

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3

आजच्या नोंदी नुसार नागरी -125 तर ग्रामीण भागात 310 असे एकूण 435 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *