सोलापूर ग्रामीण| कोरोनामुक्त 461 तर 352 पॉझिटिव्ह ; 10 जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी दि.30 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 352 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 222 पुरुष तर 130 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 461 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 2712 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2363 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 25 हजार 024 इतकी झाली आहे. यामध्ये 15,431  पुरुष तर 9563 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 679 जणांचा मृत्यू झाला आहे यात 479 पुरुष तर 200 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 276 आहे .यामध्ये 4 हजार 231 पुरुष तर 2045 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 18 हजार 069 यामध्ये 10,719 पुरुष तर 7350 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0
बार्शी –नागरी 52 तर ग्रामीण 14
करमाळा –नागरी 2 ग्रामीण 3
माढा – नागरी 8 तर ग्रामीण 27
माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 60
मंगळवेढा – नागरी 9 ,ग्रामीण 11
मोहोळ – नागरी 9  ग्रामीण 16
उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1
पंढरपूर – नागरी 26 ग्रामीण 46
सांगोला – नागरी 5 ग्रामीण 15
दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 8
आजच्या नोंदी नुसार नागरी -111 तर ग्रामीण भागात 241 असे एकूण 352 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.