Breaking | अभिनेते विशाल आनंद यांचं निधन

अभिनेते विशाल आनंद यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.बॉलिवूड अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आज सोमवारी दुपारी या संदर्भातील माहिती मिळाली आहे.

Actor vishal anand

‘चलते चलते’, ‘सारे गामा’, ‘दिल से मिले दिल’ आणि ‘टॅक्सी ड्राइव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
४ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशाल आनंद यांचं खरं नाव भीष्म कोहली आहे.
त्यांनी जवळपास अकरा चित्रपटांमध्ये काम केलं. काही चित्रपटांचे ते निर्माते व दिग्दर्शकसुद्धा होते.
‘चलते चलते’ हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट होता.
त्यामध्ये विशाल आनंद यांनी सिमी गरेवाल यांच्यासोबत काम केलं होतं.