मोठी बातमी | अनलॉकची नवीन नियमावली जाहीर ; जाणून घ्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने राज्यासह देशात लोक कडून करण्यात आले होते. सर्वत्र आर्थिक खीळ बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सद्यस्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाण ऐंशी टक्क्यांहून अधिक झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच हॉटेल, बार, रेस्टॉरंट नियम व अटींसह सुरू करण्यास परवानगी दिली होती. नंतर हॉटेल व बारला वेळ वाढवून दिला होता.

राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .येत्या 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुकानं उघडण्यासाठी अटी आणखी शिथिल करण्यात आल्या आहेत. यापुढे दुकानं ही सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या मुंबई मेट्रो सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर अनलॉकच्या आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहे. शाळेत 50 टक्के शिक्षकांना हजर राहण्याचे मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात नियमावली प्रसिद्ध करण्यात येत आहे.

50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येणार आहे. 50 टक्के शिक्षकांना क्षमतेनं शाळेत बोलावता येणार आहे. परंतु,31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे. त्याचबरोबर ग्रंथालय सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे आता ग्रंथालय खुली करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे….
नवीन नियामवली जाहीर

मेट्रो 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार

सकाळी 9 ते रात्री 9 दुकाने आता खुली राहणार.

ग्रंथालय खुली करण्यात येणार.

 

मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम अद्याप ही परवानगी नाही.

आठवडी बाजार सुरू होऊ शकतात, परंतु, कंटेनमेंट झोन शिवाय इतर ठिकाणी आठवडा बाजार आता सुरू होणार
लायब्ररी सुरु करताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत. उच्च तंत्र आणि शिक्षण विभागाकडून याबाबतचे SOP जारी करण्यात येणार आहेत.