‘त्या ‘ खून प्रकरणी सहा आरोपींना आणखी चार दिवस कोठडी

अक्कलकोट दि.कर्नाटकातील हिरोळी ( तालुका आळंद ) तील एका विवाहित महिलेने अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या धर्मपतीचा प्रियकराच्या मदतीने निर्घुण खून करून त्याचा मृतदेह सांगवी येथील बोरी नदीच्या पाञात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या सहा आरोपीना अक्कलकोट न्यायालयाने आणखी चार दिवसाची पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

विवाहित महिला तथा मयताचे पत्नी लक्ष्मी मलप्पा सुनगार ( वय ३० ), सैपन उर्फ गुटल्या इमाम बोबडे (वय २२ ), अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय २२), वाघेशा ईरण्णा हमणशेट्टी (वय ३०, तिघे रा.हिरोळी, ता.आळंद, जि.कलबुर्गी), संजय हिरु राठोड (वय २७ ) व भिमू गोमू राठोड ( वय ३४ दोघे रा.गांधीनगर तांडा, दुधनी, ता.अक्कलकोट) असे पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी मिळालेल्या सहा आरोपींचे नांवे आहेत.

या आधी चार आरोपींना पाच दिवसाची व दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. सर्व सहा ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश गवळी यांनी चार दिवसाच्या कोठडीत वाढ केली आहे.

मुख्य आरोपी सैपन बोबडे याचे मयत शेतकरी मलप्पा सुणगार यांच्या पत्नीशी गेल्या एक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती तीन महिन्यापूर्वी मयत पतीस झाली होती, तेव्हापासून घरी भांडण होत होते. या संबंधांत मलप्पा सुणगार हे अडथळा ठरत असल्याचे ओळखून पत्नीने ५० हजार रुपयेची सुपारी देऊन प्रियकर सैपन बोबडे याच्या चार सहकाऱ्याने खुनाचा कट रचला. आणि गांवा जवळील भिमपूर येथे भजन ऐकण्यासाठी गेलेल्या मलप्पा सुणगार यास दि. २ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुधनी ( ता. अक्कलकोट ) शिवारात आणून बोबडे व अन्य चौघांनी डोळ्यात चटणी घालून लोखंडी पारने जबर वार केले. त्यात मलप्पा जागीच मृत्यू पावला. त्यानंतर सुनगार याचे प्रेत सुतळीच्या बारदाना मध्ये बांधून दि.९ ऑक्टोंबर रोजी सांगवी येथील बोरी नदीच्या पाञात आणून टाकले होते.या घटनेमुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर खळबळ उडाली होती, पोलिसांचे कसून तपासकार्य सुरू केले.

सुरुवातीला या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल का? असा संशय बळावला होता. मात्र पोलीस तपासाअंती गुन्ह्यातील मयताचे प्रेतची ओळख त्याच्या शर्टावरील टेलरच्या नावावरून व मोबाईल नंबर वरून काढण्यात आले. त्यानंतर लगेच २४ तासात चार मुख्य आरोपीना अटक करण्यात पोलिसाना यश आले होते. त्यानंतर पत्नी व सहकारी एक आरोपीस अटक करुन खूनाचे मुख्य कारण शोधून काढले. पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पो.नि.विलास नाळे, युसूफ शेख,अंगद गीते, महेश कुंभार व अन्य कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली.

या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तपास कामासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता होती. तशी मागणी न्यायालयात केल्यानंतर सहा आरोपीच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ मिळाली आहे.