राज्यावर अस्मानी संकट घोंगावण्याचे चित्र पुन्हा दिसून येत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता हळूहळू का होईना ओसरत असतानाच हवामानात झालेल्या बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊसाची स्थिती तयार होत आहे – राज्यभरात पावसाचा मुक्काम २१ ऑक्टोबरपर्यंत असेल -याकाळात राज्यात अनेक भागात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज १८ ऑक्टोबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे
या जिल्ह्यात होणार पाऊस
१९ ऑक्टोबर रोजी – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
२० ऑक्टोबर रोजी विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यासोबत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद,
२१ ऑक्टोबर रोजी सुद्धा संपूर्ण विदर्भात पाऊसाची स्थिती कायम राहणारअसून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पाऊसाची शक्यता आहे
Leave a Reply