Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर हद्दीत आज सोमवारी दि.19 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 17 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 48 इतकी आहे. यामध्ये 38 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होतो.

आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार फक्त 258 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 241 निगेटीव्ह तर 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाने एकजण मृत्यू पावला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

मयत झालेली व्यक्ती श्रीराम नगर शहर वस्ती भवानी पेठ परिसरातील 65 वर्षाचे पुरुष असून 14 ऑक्टोबर रोजी सकाळी यशोधरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .उपचारादरम्यान 16 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी चार वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

देव नगर-सोरेगाव, आशीर्वाद नगर जुळे सोलापूर ,धरमशी लाइन मुरारजी पेठ, इंदिरा नगर विजापूर रोड, राघवेंद्र नगर सैफुल नेताजी सुभाष सोसायटी ,नीला नगर बुधवार पेठ, श्रीराम नगर शाहीर वस्ती भवानी पेठ, श्री अपार्टमेंट बुधवार पेठ, तेजस नगर होटगी रोड, सुभाष नगर मजरेवाडी, अवंती नगर जुना पुना नाका, सम्राट चौक बुधवार पेठ, रेल्वे लाईन्स, वामन नगर जुळे सोलापूर या भागातील व्यक्तींचे अहवाल बाधित आढळून आले.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9275 असून एकूण मृतांची संख्या 514 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 642 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8119 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *