पोलीस स्टेशनमध्ये बसविण्यात आली पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी वाचा…

आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये एका उपक्रमासाठी आम्ही हजर होतो. पोलीस स्टेशन म्हणलं की, सर्वप्रथम सर्वांच्या कपाळावर आठ्या येतात. कुठला गुन्हा घडला आहे का किंवा “कुछ तो गडबड है” अशी उलटसुलट चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत असते. परंतु पर्यावरणचंग जागरसंबंधी चळवळ घेऊन आज आम्ही फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजयजी साळुंके साहेब यांच्या विनंतीवरून आलो होतो. नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, बाळे व फौजदार चावडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजयजी साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये पक्षांसाठी कृत्रिम घरटे बसवण्याचा उपक्रम आज येथे आयोजित करण्यात आला होता.

फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भरपूर झाडे आहेत आणि पक्षांसाठी सुद्धा योग्य असा नैसर्गिक अधिवास असल्यामुळे साळुंखे साहेबांनी स्वतःच्या खर्चाने या परिसरामध्ये कृत्रिम घरटे लावण्याच्या निश्चय केला आणि त्यासाठी लागणारे साहित्य व त्यासाठी होणारा खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून करण्याचा निर्धार केला. “आधी केले मग सांगितले” या उक्तीनुसार साहेबांनी या कार्याची सुरुवात आधी स्वतःपासून केली आहे आणि यापुढे जाऊन सोलापूरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हा उपक्रम घेण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्री संजय साळुंके साहेब म्हणाले की, प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे व ओझोनचे प्रमाण वरचेवर कमी होत आहे. याचा परिणाम जीवसृष्टीतील पशुपक्षी, प्राणी आणि मनुष्य यांच्यावर होताना दिसत आहे. आज शहरांमध्ये झाडांची बेसुमार कत्तल होत आहे तसेच मनुष्य आपलं घर बांधताना पारंपारिक छप्पर किंवा कौलारू घरं बांधण्याऐवजी सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून आरसीसी कंट्रक्शन उभा करत आहे. त्यामुळे चिमण्या पक्षी पाखरे यांना त्यांचे घरटे बनवण्यासाठी आवश्यक असणारा असणारे कप्पे, मोकळी जागा मिळणे अशक्यप्राय होत आहे. त्यामुळे चिमण्यांनी तर आज शहराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अशा पक्षांसाठी त्यांचे खाद्या, निवारा, घरटे यांची व्यवस्था केली तर ते निश्चितच पुन्हा शहराकडे वळतील असा मला विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पशुपक्षी, प्राणी आणि मनुष्य हे सर्वजण या निसर्ग साखळीचे महत्वाचे भाग आहे. हा समतोल व्यवस्थित टिकला तरच निसर्ग टिकणार आहे आणि पर्यायाने मनुष्य सुद्धा टिकणार आहे. त्यामुळे या पर्यावरणाचे रक्षण, जतन व संवर्धन करणे हे संविधानानुसार गरजेचे आहे हे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, बाळे टीम तर्फे कृत्रिम घरटी बनवण्याचा हा जो उपक्रम घेण्यात आला त्यामुळे आमच्या पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहावे, त्यांना पशुपक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू यावा तसेच या धावपळीच्या जीवनामध्ये येथील निसर्गसंपन्न परिसरात कर्मचाऱ्यांनी ताण तणावापासून दूर राहावे याकरिता हा उपक्रम आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, बाळे टीमचे आभार मानले व भविष्यातही अशाच प्रकारचे नैसर्गिक उपक्रम आपण एकमेकाच्या सहकार्याने उत्साहात पार पडू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी निसर्गप्रेमी संतोषभाऊ धाकपाडे, पंकज चिंदरकर, अजित चौहान, सुरेश क्षिरसागर, सोमानंद डोके, महादेव डोंगरे, अजय हिरेमठ, विनय गोटे, सिद्धांत चौहान, रुद्रप्रताप चौहान व फौजदार चावडी पोलीस स्टेशनचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.