सोलापूर, दि.27: शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊन सिंचन करता येण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांनी विशेष घटक योजनेंतर्गत नवीन सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. लाभार्थ्यांनी https://www.mahadiscom.in/solar/ या पोर्टलवर योजनेविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiAction=getA1From या लिंकवर क्लिक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे.
Leave a Reply