देवींच्या महावस्त्राचा लिलाव टाळून ‘या’ भगिनींसाठी कल्याणी माता मंडळाचा उपक्रम

सोलापूर (प्रतिनिधी)
जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथील कल्याणी माता नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने पारधी वस्तीतील गोरगरीब महिलांना 200 साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम ,मंडळाचे अध्यक्ष कृष्णा झिपरे याची प्रमुख उपस्थिती होती.

विजयादशमी चे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. दर वर्षीपासून देवी भक्त श्रद्धेने माता कल्याणीची पूजा करून देवीला साडी अर्पण करतात. मंडळाच्यावतीने या साड्यांचा लिलाव करण्यात येऊन मंडळाचा खर्च भागविला जात असे. दरवर्षी मोठय़ा उत्साहात मिरवणुकीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो.पण यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने साड्यांचा लिलाव न करता ह्या साड्या गोरगरीब महिलांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.

यावेळी विश्वा स्वामी, महेश गुब्याड, आशुतोष माने सीताराम बाबर ,सनी पटू ,अजित शेटे ,सोमनाथ पात्रे ,दता खयाड ,लिगराज खयाड ,श्रीशेल खयाड ,पापा पगूडवाले , सगमेश्वर खयाड ,संजय चव्हाण ,अरविद शेळके, शांतप्पा बोरोटे, पराग मदने इत्यादी उपस्थित होते.