आज बरे जाले 161 तर; तर नवे बाधित रुग्ण…

आज गुरुवारी दि.29 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 188 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 116 पुरुष तर 72 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 161 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2810 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2622 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 30 हजार 429 इतकी झाली आहे. यामध्ये 18,795 पुरुष तर 11,634 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 906 जणांचा मृत्यू झाला आहे यात 645 पुरुष तर 261 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 863 आहे .यामध्ये 2 हजार 116 पुरुष तर 747 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 26 हजार 660 यामध्ये 16,034 पुरुष तर 10,626 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 11 तर ग्रामीण 5

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 12

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 24

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 42

मंगळवेढा – नागरी 2 ग्रामीण 3

मोहोळ – नागरी 5 ग्रामीण 18

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 4

पंढरपूर – नागरी 8 ग्रामीण 45

सांगोला – नागरी 5 ग्रामीण 1

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3

आजच्या नोंदी नुसार नागरी – 31 तर ग्रामीण भागात 157 असे एकूण 188 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.