कोजागिरी पौर्णिमाचे औचित्य साधून श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेला हिंदुत्ववादी विचारवंतांचा स्नेह मेळावा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.शिवदासमय मंगल कार्यालय येथे शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आराध्यदैवत तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह शिवानंद कल्लूरकर व गो-रक्षक सुधीर बहिरवाडे यांनी गो-मातेचे महत्व पटवून सांगितले.

श्रीराम जन्मोत्सव समितीने कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याचे प्रकाशन महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद थोबडे,अमर बिराजदार,संजय साळुंखे, सुधीर बहिरवाडे, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने,यतिराज होनमाने,महेश जेऊर,विनोद गडगे,डोंगरेश चाबुकस्वार,योगेश कबाडे,गुरुराज पदमगोंडा व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

हरियाणा येथे लव्ह जिहाद च्या षडयंत्र रचून हत्या करण्यात आलेल्या निकिता तोमर व विश्वहिंदुपरिषदेचे दक्षिण प्रांत प्रचारक स्व.भुजंगराव घूगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.समितीच्या कार्याचे प्रमुख पाहुणे असलेले ऍड.मिलिंद थोबडे व शहर कार्यवाह शिवानंद कल्लूरकर व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी कौतुक केले व समिती सदस्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन समितीचे यतिराज होनमाने व अक्षय अंजिखाने यांनी केले तर आभार सागर अतनुरे यांनी मानले.


Leave a Reply