सोलापूर | आजपर्यंत 3642 महिलांनी केली कोरोनावर मात ; आजचे पॉझिटिव्ह ‘या’ भागातील…

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.5 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 33 रुग्ण आढळले असून यामध्ये 18 पुरुष तर 15 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 18 इतकी आहे.
आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1172 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 1139 निगेटीव्ह आहेत.

आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.श्रीकांत नगर भागात राहणारी जुळे सोलापूर परिसरातील 75 वर्षाचे पुरुष 29 ऑक्टोबर रोजी सकाळी यशोधरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले होते.उपचारादरम्यान 3 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल पॉझिटिव्ह आहे .

आज आढळलेले पॉझिटिव्ह…

शिवाजी नगर बाळे ,कमटम वसाहत एमआयडीसी, द्वारका नगर विजापूर रोड,गणेश हॉल रेल्वे कॉलनी, गांधी नगर, अक्कलकोट रोड ,साखर कारखाना जवळ मजरेवाडी, लक्ष्मीनगर हत्तुरे वस्ती, शिवाजीनगर गोंधळी वस्ती,ज्योती नगर आकाशवाणी केंद्राजवळ,

देशमुख पाटील वस्ती, शेटे नगर, भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, कर्णिक नगर,निर्मिती विहार विजापूर रोड, दमाणी नगर,माजी सैनिक सोसायटी विजापूर नाका, काजल नगर, सहारा नगर ,आसरा सोसायटी,आदित्य नगर साई होम्स, वामन नगर गीता नगर गोविंद श्री मंगल कार्यालय मागे,फुरडे रेसिडेन्सी विजापूर रोड, बॉम्बे पार्क जुळे सोलापूर, बनसिध्द नगर सोरेगाव, भवानी पेठ, दयानंद कॉलेज जवळ, सिंधू विहार जुळे सोलापूर  या परिसरातील बाधित रुग्ण आढळले आहेत.

 

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9723 असून एकूण मृतांची संख्या 542 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 432 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8749 इतकी आहे.