सोलापूर : इनोव्हा गाडीतून येऊन चोरांनी नवी पेठेतील तीन-चार दुकानात चोरी केली आहे. पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. यात तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापुरातील मुख्य बाजारपेठेत चोरांनी हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास चार-पाच दुकानांत चोऱ्या झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी पेठ परिसरातील सरगम शॉपी, सर्वोदय ट्रेडर्स, लूक इन, आरती मॅचिंग याशिवाय आणखी एक-दोन दुकानांत चोरी झाली आहे. पहाटे साडे चार ते पाचच्या दरम्यान चोरट्यांनी दुकान फोडले, दुकानांमधील रोकड गायब केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इनोव्हा गाडीतून 3 चोर येऊन चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.