Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

मुंबई: व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच यूजर्संसाठी आणखी एक नवं फीचर घेऊन येतोय. हे फीचरमध्ये व्हिडिओ म्यूट करण्याचा हा पर्याय असू शकतो. म्हणजेच जर आपल्याला एखादा व्हिडिओ शेअर करण्याचा आधी किंवा स्टेट्स ठेवण्याआधी म्यूट करता येईल. हे नवं फीचर सुरुवातीला अँड्रॉईड (Android) यूजर्ससाठी डेव्हलप केलं जाऊ शकतं. तसंच भविष्यात हे फीचर आयफोन यूजर्ससाठी देखील रोलआऊट केलं जाऊ शकतं.

व्हॉट्सअॅपच्या एका रिपोर्टनुसार, ट्रॅकर WABetaInfo दिलेल्या वृत्तानुसार, अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपने 2.20.207.2 बीटाला कॉन्ट्रक्ट अपडेट पाठविण्यापूर्वी किंवा अपडेट करण्यापूर्वी व्हिडिओ म्यूट करण्याची क्षमता दर्शविली आहे. WABetaInfo द्वारे पोस्ट केलेला स्क्रीनशॉट दर्शवितो की, एक स्पीकर आयकॉन त्या व्हिडिओचा अवधी आणि फाईल आकारची सर्व माहिती बाजूला उपलब्ध असेल. जे यूजरला शेअर करायचे असेल. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर करण्याआधी त्या आयकॉनवर टॅप केल्यास व्हिडिओ म्यूट होऊ शकतो.

 

नवं फीचर हे बीटा टेस्टसाठी उपलब्ध होणं अद्याप बाकी आहे. तथापि, व्हॉट्सअॅप भविष्यातील अपडेटमध्ये अँड्रॉइड यूजर्ससाठी व्हॉट्सअॅप लाइव्ह आणण्याची शक्यता आहे. म्यूट व्हिडिओ पर्यायाव्यतिरिक्त WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, व्हॉट्सअॅप Read later या फीचरवर काम करत आहे. जे आर्काइव चॅटला बदलून टाकेल. नवीन फीचर हे आयफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅप 2.20.130.16 बीटाचा भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *