मुंबई,दि.20 : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही.
राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असंही बंधन नसणार आहे.
सोमवारपासून 23 नोव्हेंबर राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे.
शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
Leave a Reply